logo

Need a helping hand?
Call us on - 8888982222


अंधत्व निवारणाच्या कार्याबरोबरच साई सूर्य नेत्रसेवा या संस्थेने तरूणांना असलेला दृष्टिदोष व चष्मा घालविण्याचे व त्यांचे हरविलेले स्वप्न त्यांना परत मिळवून देण्याचे कार्य मागील 32 वर्षापासून केले आहे. भारतात डॉ. प्रकाश व डॉ. सौ. सुधा कांकरिया यांनी नेतृत्व करून आपली ओळख निर्माण केली आहे. याचा फायदा युवा पिढीला व्हावा यासाठी युवकांना नको असलेला चष्मा घालविण्याचे व्हिजन परफेक्ट लॅसिक लेसर नेत्र उपचार शिबीर करीत आहोत.

व्हिजन परफेक्ट- सर्वोत्तम तंत्रज्ञान- भारतात प्रथमच . . .हे लेसर उपचार अमेरिकेतील नासा या अंतरिक्ष संशोधन करणार्‍या संस्थेने त्यांच्या अंतराळवीरांच्या नेत्र उपचारासाठी विकसित केली असून व्हेव्हलाईट (जर्मनी) या संस्थेने भारतात प्रथमच नगरमधील साई सूर्य नेत्रसेवा येथे कार्यान्वित झाली. त्याचा लाभ या शिबीरातील रूग्णांना होणार आहे.

लॅसिक लेसर प्रणाली विषयी थोडक्यात-ही दृष्टीदोषांवर सर्वात अत्याधुनिक उपचार पध्दती समजली जाते. या उपकरणांद्वारे अलगदपणे बुबुळाचे आवरण एका बाजुस सरकावून नंतर एक्सायमर लेसर किरणांचा उपयोग गोलाई बदलण्यास केला जातो. आवरण जागेवर बसविले जाते. रूग्णास लगेच स्वच्छ दिसावयास लागते. जखम नाही. पट्टीची गरज नाही. दोन्ही डोळयावर एकाच वेळेस उपचार करता येतात व दोन दिवसात रूग्णास सर्व कामे करता येतात. या पद्धतीत - 14.00 पर्यंत, +6.0 पर्यंत व सिलेंड्रिकल नंबर यावर उपचार करता येतात. अहमदनगरच्या साई सूर्य नेत्रसेवा या संस्थेत ऍलिग्रेटोवेव्ह ही जगातील सर्वोत्तम लॅसिक लेसर प्रणाली उपलब्ध असून व त्यावरील उपचार जगातील सर्वोत्तम ठरले आहेत.


दृष्टीदोष शस्त्रक्रिया कोणी करून घ्यावी ?शक्यतोवर 18 वर्षांपेक्षा अधिक वय व स्थिर नंबर असणार्‍या रूग्णांनी


ही शस्त्रक्रिया कोणाला करता येत नाही ?नंबर स्थिर नसल्यास, अश्रुंचे प्रमाण कमी असल्यास, केरॅटोकोनस इ. बुबुळाचे आजार असल्यास, बुबुळ पातळ असल्यास करू नये.


प्रत्येकाचा नंबर पुर्ण जातो का ?शक्यतोवर होय. क्वचित टच-अप करण्याची गरज पडू शकते. कॉन्टॅक्ट लेन्सेस शस्त्रक्रियेआधी 1 ते 2 आठवडे तरी बंद करावी व 2 दिवस आधी अँटीबायोटीक औषधे घ्यावी.


शस्त्रक्रियेनंतर काय काळजी घ्यावी ?एक आठवडा काळा चष्मा वापरावा, सांगितल्याप्रमाणे औषधे घ्यावी, डोळा चोळू नये, डोळयातून पाणी येणे, उजेडाकडे पाहण्यास त्रास होणे, इ. तक्रारी 2 दिवसात कमी होतात व नंतर सगळी कामे करता येतात. दोन आठवडयात व पुढे गरजेप्रमाणे तपासणी करावी.


या शस्त्रक्रियेचा परिणाम कायम असतो का ?शक्यतो होय

सर्वात मोठा अनुभवआंतरराष्ट्रीय किर्तीचे नेत्रतज्ञ डॉ. प्रकाश कांकरिया व डॉ. वर्धमान कांकरिया स्वत: शस्त्रक्रिया करणार असून त्यांनी आजपर्यंत 1 लाखांपेक्षाही अधिक लेसर शस्त्रक्रिया केल्या आहेत. एकाच दिवसात 100 पेक्षाही जास्त शस्त्रक्रिया 48 वेळेस केल्या असून असे करणारे ते जगातील पहिलेच नेत्रविशारद आहेत. Limka व Guinness Book of World Records डॉ. प्रकाश व डॉ. वर्धमान यांच्या कार्याची दखल घेतली आहे.